औसा: औसा तालुक्याच्या बडूरची रूपाली बोधे आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय संघाची कर्णधार ठरली; आ.अभिमन्यू पवार यांनी केले अभिनंदन
Ausa, Latur | Oct 31, 2025 औसा-औसा तालुक्यातील बडूर गावची कन्या कु. रूपाली विठ्ठल बोधे हिने भारतीय क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेत औसाचा नावलौकिक वाढवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 15 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रस्सीखेच या क्रीडा प्रकारात तिने भारतीय संघाच्या कर्णधार म्हणून काम पाहिले.तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला आहे.देशाच्या पातळीवर जबाबदारी स्वीकारून उल्लेखनीय प्रदर्शन करणाऱ्या रूपाली बोधेच्या या यशाबद्दल औसा मतदारसंघाचे आ.अभिमन्यू पवार यांनी रूपालीचे अभिनंदन केले.