बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे आज शुक्रवार दि.19 डिसेंबर रोजी, सकाळी 11 वाजता, शेतकऱ्यांनी भाववाढीच्या मागणीसाठी बैठक घेतली. बसस्थानक परिसरात झालेल्या या बैठकीत “शेतकरी हक्क मोर्चा” यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत दि. 25 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.कापूस, सोयाबीन व तूर पिकांना योग्य दर न मिळाल्याने शे