पोलिसांनी जिल्ह्यातील विविध १९ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला ७०९ किलो २८० ग्रॅम गांजा आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून बुधवारी २४ डिसेंबर दुपारी चार वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या आवारात खड्डा खोदून नष्ट केला. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नष्ट समितीने ही कारवाई केली.