जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात जामनेर येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यातील ९१ हजार रूपये किंमतीची सोन्याची माळ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याबाबत बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.