शारदा चौक येथे अज्ञात व्यक्तीच्या मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानीय पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू केला आहे. थंडीमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे. परंतु हा अकस्मात मृत्यू आहे की घातपात हे शव विच्छेदनानंतर तपासात पुढे येईल. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे