परळी: शिरसाळा येथे होणाऱ्या शेतकरी संवाद मिळाव्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा घेतला.
Parli, Beed | Nov 3, 2025 आज जिल्हाधिकारी बीड यांनी शेतकरी वर्गांच्या प्रगतीसाठी कार्यरत मयांक गांधी यांच्या ग्लोबल विकास ट्रस्ट ला शिरसाळा येथे भेट देऊन आगामी शेतकरी संवाद मेळावा (दि. 7 नोव्हेंबर 2025) संदर्भात तयारीचा आढावा जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी घेतला व मार्गदर्शनात्मक संवाद साधला. या प्रसंगी सहायक पोलीस अधीक्षक माजलगाव, उपविभागीय अधिकारी परळी तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांचा संयुक्त प्रयत्न हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे.