कराड: कराड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारांना चिन्ह वाटप जाहीर
Karad, Satara | Nov 26, 2025 कराड नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना बुधवारी सकाळी अकरा वाजता चिन्हांचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष पदाचे ९ व प्रभाग १ ते १५ प्रभागातील एकूण १०९ उमेदवारांना निवडणूक निरीक्षक ज्योती कावरे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी अधिकृत चिन्ह वाटप करून यादी प्रसिद्ध केली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे व प्रशांत व्हटकर उपस्थित होते. कराड नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या ९ उमेदवारांचे चिन्ह वाटप जाहीर करण्यात आले.