चंद्रपूर: आजाराला कंटाळून युवकाची रेल्वेखाली आत्महत्या, चांदगाव येथील घटना
आजाराला कंटाळून युवकाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. स्वदीप रामटेके असे मृत युवकाचे नाव आहे. युवक पोटाच्या आजाराने त्रस्त होता. उपचार घेऊनही ठीक होत नसल्याने त्याने आत्महत्या केली आहे. रेल्वे व ब्रम्हपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस कर आहेत.