जालना: MIDC परिसरात अवैध दारू विक्रीवर चंदनझीरा पोलिसांचा धडक छापा..
२६ हजारांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त; आरोपीवर गुन्हा दाखल
Jalna, Jalna | May 17, 2026 MIDC परिसरात अवैध दारू विक्रीवर चंदनझीरा पोलिसांचा धडक छापा.. २६ हजारांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त; आरोपीवर गुन्हा दाखल.. आज दिनांक 17 रविवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना MIDC परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यावर चंदनझीरा पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.