तुमसर: सीतासावंगी येथे मोहफुलाची दारू विक्री करणाऱ्या महिला दारू विक्रेत्याविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे दि. 28 नोव्हेंबर रोज शुक्रवार ला सायं.6 वाजताच्या सुमारास गोबरवाही पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोहफुलाची दारू विक्री करणारी महिला मुन्नीबाई चौधरी यांच्या ताब्यातून 5 लिटर मोहफुलाची दारू असा एकूण 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महिला दारू विक्रेत्याविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.