एक व्यक्ती बिबट्याच्या पिल्लाला काखेत घेऊन बसल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत.शेगाव दर्शनासाठी पायदळ वारी करणाऱ्या भाविकांना रस्त्याच्या कडेला अचानक ही बिबट्याची पिल्ले दिसून आली. या मार्गावरून दररोज हजारो भाविक शेगावकडे पायदळ प्रवास करतात. बिबट्याची पिल्ले दिसले याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले