नगर: 'पैसे घेऊन कुणबी दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांवर मोक्का लावा'
एडवोकेट गजेंद्र दांगट
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर येथे कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच एका त्रयस्त वक्तीकडून मागण्यात आली. त्या व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल झाला आहे. या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड. गजेंद्र दांगट यांनी संबंधित अधिकाऱ्यावर व त्रयस्थ व्यक्तीवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे