जळगाव ते ममुराबाद रोडवरील चिंचोली हद्दीजवळ दुचाकीसमोर अचानक कुत्रे आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिला गंभीर जखमी झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी गुरूवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जखमी महिलेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.