जालना: जालना जलकवच अभियान-2026 ची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश
Jalna, Jalna | Jun 8, 2026 जिल्ह्यात संभाव्य कमी पर्जन्यमान, पाणीटंचाई आणि भूजल पातळीतील घट यांचा विचार करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जालना जलकवच अभियान-2026 राबविण्यात येत असून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. सोमवार दि. 8 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल उपस्थित होते.