गेवराई: धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी गेवराईत एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली,नातेवाईकांनी मृतदेह तहसील समोर मांडला
Georai, Beed | Oct 7, 2025 धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी शहरातील एका ४५ वर्षीय इसमाने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी उघडकीस आली. मयताच्या खिशातून बलिदान वाया जाऊ देऊ नका अशी विनंती केल्याची चिठ्ठी सापडल्याने ही आत्महत्या आरक्षणासाठी केल्याचे दिसून येत आहे. तर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह गेवराई तहसील कार्यालय समोर आणून ठेवला आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तालुका प्रशासनाची धावपळ उडाली आहे. ज्ञानदेव नामदेव कोल्हे असे त्यांचे नाव