गडचिरोली: कसनसूर येथे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गोवंश तस्करी उघड...
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कसनसूर उपपोलीस ठाण्यात प्राण्यांच्या अमानुष छळप्रकरणी मोठा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कसनसूर येथील वेन्हारा चौकात गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली. यावेळी आयशर ट्रक व कार मधून गोवंशाची निर्दय वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले.