गडचिरोली: हात लावताच रस्ता गायब ! अभियंता दिनाच्या दिवशीच अभियंत्यांचे पितळ उघडे..धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ते सोमलपूर रस्ता
धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ते सोमलपूर हा पाच महिन्यांपूर्वी डागडुजी करण्यात आलेला रस्ता आज गायब झाल्याचे चित्र आहे. आझाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी केली असता रस्त्याला हात लावतात गिट्टी बाजूला झाली.