जालना: भगवान परशुरामांचा आदर्श समाजात एकात्मता व संस्कार वाढवणारा - सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांचे प्रतिपादन
Jalna, Jalna | Apr 20, 2026 भगवान परशुरामांचा आदर्श समाजात एकात्मता व संस्कार वृद्धिंगत करू शकतो, असे मत ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष रमेश देहेडकर यांनी व्यक्त केले. सोमवार दि.20 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना भागातील ब्राह्मण सभेच्या सभागृहात भगवान परशुराम जयंतीनिमित्त रविवारी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात बोलताना रमेश देहेडकर यांनी भगवान परशुराम यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.त्यांच्या विचारांमधून समाजात जागृती होते.