जळगाव शहरातील ओंकार नगरात राहणाऱ्या एका तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली. याप्रकरणी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. निलेश मिलींद पाटील वय २४ रा. ओंकार नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.