सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतीक्षित बसपोर्ट प्रकल्पावर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. महापालिकेकडून अद्याप ‘बांधकाम परवानगी’ न मिळाल्यामुळे बसपोर्टचं काम सुरूच होऊ शकलेलं नाही.परिणामी, सिडको बसस्थानकाचे चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत प्रस्तावित स्थलांतरही लांबणीवर पडले आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन २८ ऑगस्ट २०१९ रोजी झालं