पारोळा: तालुक्यातील टिटवीतील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी माहेरच्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 'ठिय्या'
Parola, Jalgaon | Sep 16, 2025 पारोळा---- तालुक्यातील टिटवी येथील विवाहिता कविता राजू सोनवणे हिचा सासरच्या लोकांनी सतत शारीरिक आणि मानसिक छळ करून अखेर शॉक देवून जीवे ठार मारल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीही कारवाई केलेली नसल्याने मृत विवाहितेच्या परिवाराने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.