उरण: उरण येथील आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार
Uran, Raigad | Nov 6, 2025 नेहरू आर्ट गॅलरी, मुंबई येथे होणाऱ्या ‘बाल दिशा’ राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनासाठी उरणमधील कवीश पाटील, मयांक म्हात्रे, आणि सौमित्र सोमई या ३ विद्यार्थ्यांची निवड होणं ही संपूर्ण उरण आणि रायगड जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. हे विद्यार्थी आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. राज्यभरातून केवळ २५ विद्यार्थ्यांमध्ये त्यांची निवड होणं हे त्यांच्या कलेतील कौशल्य, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिक्षक रुपेश पाटील यांच्या योग्य मार्गदर्शनाचे फळ आहे. आज गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास आमदार महेश बालदी यांनी या गुणी कलाकार विद्यार्थ्यांचा जनसंपर्क कार्यालयात सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचा आत्मविश्वास, मेहनत आणि कलाकृती निश्चितच अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे.