जालना: जालना मर्चंट बँक फसवणूक प्रकरणात आरोपी रायचंद कुरंगळ अटकेत; 23 कोटी 33 लाखाचा अपहार, 8 दिवसांची पोलीस कोठडी
Jalna, Jalna | Apr 17, 2026 जालना मर्चंट बँकेची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पंचमुखी वेअर हाऊसचा प्रोप्रायटर रायचंद सखाराम कुरंगळ याला आर्थिक गुन्हे शाखेने अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातून अटक केली आहे. गुरुवार दि. 16 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पंचमुखी वेअर हाऊस आणि जालना मर्चंट बँक यांच्यातील करारानुसार, वेअर हाऊसमध्ये मालधारकांचा शेतमाल साठवून त्यावर पावत्या देण्यात येत होत्या.