पिंपरी-चिंचवड परिसरात चारित्र्यावर संशय घेतल्याने पतीचा गळा आवळून खून करणाऱ्या महिलेच्या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.पोलिसांनी आधी आरोपी पत्नी चैताली नकुल भोईर (वय २८) हिला ताब्यात घेतले होते, तर आता तिच्या प्रियकराला सिद्धार्थ दिपक पवार (वय २१, रा. बालाजी अपार्टमेंट, चिंचवड) चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.