अनेक ठिकाणी अनुदानित बियाण्यांची टंचाई निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांना लागवडीसाठी आवश्यक बियाणे वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी अनुदानित बियाण्यांचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी आज दि 30 ऑक्टोबर 2 वाजता सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी पुत्र शुभम शिवशंकर आमने परिसरातील शेतकऱ्यांसह यांनी उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरीणखेडे यांच्याकडे केली.