जळगाव शहरातील काशीनाथ चौकात रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका भरधाव मालवाहू महिंद्रा पिकअप गाडीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, अपघात करणारा पिकअप चालक घटनेनंतर अपघातस्थळावरून पसार झाला आहे. याबाबत रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.