तुमसर तालुक्यातील लंजेरा येथे आज दि. 18 जानेवारी रोज रविवारला दुपारी 4 वाजता पंचायत समिती सदस्य गुरुदेव भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदीप ताले यांच्या हस्ते शंकरपटाचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी परिसरातील मान्यवर व तालुक्यातील पटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.