रोहा: रोहा येथे शिवसेना रोहा शहर महिला प्रमुख ॲड. मयुरा मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश
Roha, Raigad | Nov 24, 2025 आज सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना रोहा शहर महिला प्रमुख ॲड. मयुरा मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. ॲड. मयुरा मोरे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे रोहा तसेच, आसपासच्या भागातील संघटनात्मक बळकटी वाढणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या कार्याला नवीन ऊर्जा आणि गती मिळणार आहे.