शनिशिंगणापूर येथील वात्सल्य वाहनतळात पोलिसांनी शिर्डी- शिंगणापूर मार्गावर टेम्पो ट्रॅव्हलवर बनावट नोंदणी क्रमांक टाकून प्रवासी वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले. चालक किरण बाबासाहेब तुरकणे (रा.-पिंपळवाडी रस्ता, शिर्डी) यास अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके व पथकाने ही कारवाई केली. सागर शेजूळ यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून चालकास अटक केली.