समुद्रपूर: मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात गुडी उभारू शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा
मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात रयतेचा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामपंचायतीच्या प्रांगणात गुडी उभारू सरपंच विलास नवघरे यांच्या हस्ते शिवरायांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन मानाचा मुजरा करून ध्वजपताका लावण्यात आली.त्यांनतर शिवगर्जना, राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची समाप्त करण्यात आली.