उत्तर सोलापूर: दोघा अल्पवयीन चोरट्यांकडून 5 लाखांची चोरी उघडकीस; सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण...
जेलरोड पोलिसांनी अल्पवयीन मुलांनी केलेली तब्बल पाच लाख रुपयांची चोरी उघडकीस आणत मोठे यश मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुले मोटारसायकल खरेदी करण्यासाठी पद्मशाली चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, जेलरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी रविवार पेठ येथील उघड्या घरातून चोरी केल्याची कबुली दिली.