जालना: जालन्यात डिझेलटंचाईचा मोठा फटका; 2 हजारांहून अधिक ट्रक उभे
Jalna, Jalna | May 25, 2026 जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या डिझेलटंचाईचा मोठा फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसत असून सुमारे 2 ते अडीच हजार ट्रक उभे राहिल्याची माहिती समोर आली आहे. डिझेलअभावी ट्रकच्या फेऱ्या निम्म्यावर आल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसाय पूर्णपणे संकटात सापडला आहे. जालना जिल्हा ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष सुरेश उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जिल्ह्यात डिझेलची टंचाई कायम आहे. यामुळे मालवाहतूक विस्कळीत झाली असून दररोज तब्बल 6 ते 7 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. ड