तेल्हारा: तेल्हाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती विठ्ठल रुक्माई मंदिरात संपन्न झाले.
Telhara, Akola | Nov 12, 2025 अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपालिका निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवड प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज तेल्हारा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भागवत मंगल कार्यालय येथे पार पडल्या. 42 पैकी 24 इच्छुकांनी मुलाखत दिली असून उर्वरित मुलाखती पुढील दोन दिवसांत घेतल्या जाणार आहेत.