औंढा नागनाथ: सूरेगाव येथे इंस्टाग्राम वरील महिलेचा व्हिडिओ शेअर केल्याचा वाद चिघळला;तरुणास मारहाण,चौघांवर गुन्हा दाखल
इंस्टाग्राम वर महिलेचा व्हिडिओ शेअर का केला याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना दिनांक 5 नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता तालुक्यातील सुरेगाव येथील बसस्थानक रोडवर घडली आहे. याप्रकरणी मावेश यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नारायण श्रीरामे,सह तिघाविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक पाच नोव्हेंबर बुधवार रोजी रात्री साडेअकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.