कामठी: नेरी येथे वीस दिवसापूर्वी झालेल्या वादातून रेती व्यावसायिकाचा निर्घृण खून, नेरी गावाच्या उपसरपंचासह तिघांना अटक
Kamptee, Nagpur | Oct 16, 2025 विवेक दांडेकर वय 28 वर्ष हा रेतीचा व्यवसाय करतो. वीस दिवसापूर्वी गावातच राहणारे देविदास वाडीभस्मे यांनी त्यांच्या काका काकूला शिवीगाळ केल्याने देविदास व विवेक यांच्यात वाद झाला होता याबाबत नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती याप्रकरणी न्यायालयात केस देखील सुरू आहे. 15 ऑक्टोंबरला रात्रीच्या सुमारास आरोपी देविदास वंजारी याने विवेक ला फोन करून बोलविले आणि अन्य आरोपी केशव गिरी तसेच साहिल घाटोळे यांना बोलवून खून केला.