जालना: दोन तासांत ट्रक चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, 12 लाखांचा ट्रक जप्त
Jalna, Jalna | May 30, 2026 जालना शहरातून चोरीला गेलेला टाटा कंपनीचा ट्रक अवघ्या दोन तासांत शोधून काढत स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली. शनिवार दि. 30 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत सुमारे 12 लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र नामदेव धनावडे (रा. धायरी, जि. पुणे) यांच्या मालकीचा टाटा ट्रक क्र. एमएच 11 डीडी 3577 हा 29 मे रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास जालना येथील मंगलमुर्ती ट्रान्सपोर्ट परिसरातून ट्रक चोरीला गेले होते.