वाडा: निवडणुकीत जे कोणी बरोबर येतील त्यांना आम्ही बरोबर घेऊन जाऊ- शिवसेना शिंदेगट उपनेते निलेश सांबरे
Vada, Palghar | Nov 16, 2025 पालघर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जव्हार येथे अजित पवार गटाबरोबर शिवसेना शिंदे गटाची युती झाली असून वाडा येथे याबाबत चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जे कोणी सोबत आणि बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे उपनेते निलेश सांबरे यांनी दिली आहे. भाजपकडून कोणताही प्रस्ताव वाडा येथे नगरपंचायत निवडणुका संदर्भात आलेला नसल्याने शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.