जालना: आमची जनगणना, आमचा विकास; नागरिकांनी स्व-गणना मोहिमेत सहभागी व्हावे - नगराध्यक्ष वंदनाताई बोराडे
Jalna, Jalna | May 7, 2026 भारत सरकारच्या वतीने जनगणना 2027 ची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबवण्यात येत असून महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील घरयादी व घरगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांसाठी स्व-गणना ही अभिनव सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मंठा नगराध्यक्ष वंदनाताई वैजनाथ बोराडे यांनी गुरुवार दि. 7 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता दिली आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, अचूक नियोजनासाठी आणि भविष्यातील धोरणनिर्मितीसाठी जनगणना अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून जनगणना 2027 च्या जनगणनेला सुरुवात झाली.