पोलादपूर: पोलादपूर नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या स्नेहा सचिन मेहता यांची आज बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली
पोलादपूर नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या स्नेहा सचिन मेहता यांची आज बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नगराध्यक्ष स्नेहा मेहता यांना शुभेच्छा देत शहराच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवच, निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत अधिकारी पोपट ओमासे यांच्याकडून स्नेहा मेहता यांना उपस्थितीत पदभार देण्यात आला यावेळी दक्षिण रायगड शिवसेना सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, मुंबई संपर्कप्रमुख किशोर भाऊ जाधव. सदर वेळी शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांची उपस्थित होते. हि मेहता परिवाराच्या सामाजिक बांधिलकीची व शिवसेना पक्षाशी असलेल्या बांधिलकीची पोच पावती मानली जाते.