वसई: वसई माणीकपुर येथे विजचोरी प्रकरणी ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल
Vasai, Palghar | Apr 19, 2024 वसईच्या माणिकपूर येथील जॉसेफ मेनेझिस या वीजग्राहकाने वीज वितरण कंपनीची १ मार्च २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये ४०,४२० रुपये एवढ्या रकमेची वीजचोरी करून महावितरणचे आर्थिक नुकसान केले आहे. महावितरणचे प्रशांत आडभाई यांनी बुधवारी माणिकपूर पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. वसई-विरार परिसरात वीजचोरीच्या घटनांत वाढ झालेली असून महावितरणने वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे.