जालना: अंबड आत्महत्या प्रकरणी जालना जिल्हा युवक काँग्रेस आक्रमक; NEET घोटाळ्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन..
Jalna, Jalna | Jun 29, 2026 अंबड आत्महत्या प्रकरणी जालना जिल्हा युवक काँग्रेस आक्रमक; NEET घोटाळ्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन.. आज दिनांक 29 सोमवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंबड येथील विद्यार्थिनी मिसबा खलिल शेख हिच्या आत्महत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच NEET परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ जालना जिल्हा युवक काँग्रेसने सोमवारी अंबड येथे आक्रमक आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनांनंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.