होळीच्या पर्वावर रामटेक शहरातील विविध ठिकाणी सोमवारला होलिका दहनानंतर मंगळवार दिनांक 3 मार्चला सकाळपासूनच रामटेक शहरात रामटेककर धुळवडीच्या रंगात रंगताना दिसले. रामटेक शहरात धुलीवंदन अत्यंत उत्साहात मात्र शांततेत पार पडला. ठिकठिकाणी संदल, डीजे च्या तालावर महिला, पुरुष, युवावर्ग विविध रंगात न्हाऊन डीजेच्या तालावर नृत्य करताना दिसले.शिवसेना व काँग्रेस तर्फे चौकात होळी मिलन चे आयोजन करण्यात आले होते.