वर्धा जिल्ह्यातून एक अतिशय महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे. आपल्या कुटुंबापासून दुरावलेल्या बालकांना पुन्हा मायेची ऊब मिळवून देण्यासाठी वर्धा पोलीस आता सरसावले आहेत. जिल्ह्यात आजपासून 'ऑपरेशन मुस्कान-१४' या विशेष मोहिमेचा दणक्यात शुभारंभ झाला आहे. असे आज वीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे