अकोला : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांची बैठक घेऊन प्रत्येक कार्यवाही काटेकोरपणे पार पाडण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन व्हावे व आचारसंहितेचा भंग होऊ नये, यावर त्यांनी भर दिला. ई-भूमिती प्रणाली, डिजिटायझेशन व स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिमबाबतही आढावा घेत नागरिकांना जलद व पारदर्शक सेवा मिळावी यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता दिले