पक्षी सप्ताहाच्या चौथ्या दिवशी आज दि 8 नोव्हेंबर ला 11 वाजता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी विविध ठिकाणी पक्षी निरीक्षण केले. वनसभागृह मोहर्ली येथे पक्षी सप्ताह निमित्त CIBAचे श्री. मराठे, हिगपे , पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी निरीक्षण व पक्ष्यांची ओळख करून नोंदी घेण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली.