भद्रावती: भद्रनाग मंदिराच्या प्रांगणात दसऱ्यानिमीत्य वाइट प्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन.
भद्रावती शहरात विजयादशमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमीत्याने झिंगुजी वाल्मीक आखाडा व भंगाराम वार्ड येथील नया व्यायाम शाळेच्या वतीने भद्रनाग मंदिराच्या प्रांगणात वाइट प्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.त्यानंतर नागरीकांनी सोने वाटुन एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. प्रारंभी या दोन्ही आखाड्यांतर्फे शहरातील मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेत रामायकालीन घटनांना ऊजाळा देणारे देखावे सहभागी करण्यात आले होते.