कामठी: उन्नती शोरूम समोर दुचाकी ने एमडी ची विक्री करणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक
Kamptee, Nagpur | Oct 15, 2025 जुनी कामठी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उन्नती शोरूम समोर दुचाकीने एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव नवनीत शिवाने असे सांगण्यात आले असून आरोपीकडून 55 ग्राम एमडी आणि रोख रक्कम मोबाईल वजन काटा व इतर साहित्य असा एकूण तीन लाख 47 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे