अलिबाग: अलिबागमध्ये रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचा भव्य शुभारंभ
साहित्य दिंडीने दुमदुमला अलिबाग; मराठी भाषेचा जयघोष
Alibag, Raigad | Nov 8, 2025 महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, तसेच कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कोकण साहित्य परिषद शाखा अलिबाग यांच्या सहकार्याने आयोजित रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हे संमेलन सोहळा दि. ८ आणि ९ नोव्हेंबर २०२५ रोजी भंडारी भवन, श्रीबाग, येथे आयोजित करण्यात आले असून, उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला साहित्य दिंडी काढण्यात आली.