भोकरदन: जेवखेडा ठो.येथील शेकडो नागरिकांचे पं.स. येथे नमुना नंबर 8 मध्ये नाव घेण्यासाठी सुरू आहे आमरण उपोषण
आज दि.14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील जेवखेडा ठोमरे येथील शेकडो ग्रामस्थांचे भोकरदन पंचायत समिती कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू आहे यावेळी त्यांनी मागणी केली आहे, की या ग्रामस्थांचे मागील कित्येक वर्षापासून गायराना अतिक्रमण करून घरे बांधलेले आहेत ते नियमाकुल करून त्यांना नमुना नंबर 8 द्यावे या मागणीसाठी त्यांनी हे आमरण उपोषण सुरू केले आहे,व जोपर्यंत नमुना नंबर 8 मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.