जळगाव जामोद: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष समाधान दामधर व पदाधिकाऱ्यांचे तहसीलदारना निवेदन
शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष समाधान आमदार व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. चालुक्यात सतत झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे संत्रा फळगळ व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच केळी पिकाला भाव कमी असल्याने त्यांना प्रति क्विंटल पाचशे रुपये मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.